मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
भारतरत्न ,विश्वभूषण डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर) यांचे वडील रामजी सकपाळ हे इस्ट इंडिया
कंपनीत म्हणजे ब्रिटीश सरकार कडे सुभेदाराची नोकरी करत होते आणि त्या काळी कंपनीस
कारकुनाची गरज असल्याने भारतीय नागरिकांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले होते पुढे
१८५७ साली सक्तीचे शिक्षण बंद करण्यात आले मात्र फलटनितल्या अस्पृश्यांना शिक्षणात
गोडी निर्माण झाली होती त्यामुळ स्वताच्या मुलांना शिक्षित करत असत डॉक्टर
आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला आणि त्याचे शालेय शिक्षण व बालपण
सातारा ,रत्नागिरी आणि मुंबई येथे गेले आणि याच वेळी भारतात स्वातंत्र लढ्याची
चळवळ सुरु होती आणि इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्वच थरातील
जातीधर्माचे लोक लढत होते हा लढा तीव्र करण्यासाठी तसेच या चळवळीतील लोकांचे
प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी मध्यम होते त्यामुळ डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर जन्म होण्याआधी म्हणजे १७ व्या शतकात पासून बरयाच समाजसुधारकांनी वर्तमान
पत्रे सुरु केली .
वृत्तपत्राचा इतिहास
संवाद शास्त्राचा महापंडित
मार्शल म्याकलुव्हन याने मिडिया द मेसेज हे सूत्र जगास दिले त्याच्या
म्हणण्यानुसार वातावरणात बदल हे माध्यमामुळ होतात आणि मध्यम म्हणजे विचार होय .
भारतात इस्ट इंडिया कंपनी ने काढून टाकल्या मुल कंपनी विरुद्ध आवाज उठविण्यासाठी
जेम्स ओगस्टस हिकी याने “ द बंगाल ग्याजेट “ हे वर्तमान पत्र काढून भारतात पत्रकारितेची सुरुवात केली .
सन १८०० पर्यंत मुंबई हे प्रबोधनाचे केंद्र होते आणि मुंबई येथून २० जुलै १८२८
रोजी मुंबापुर हे वर्तमान पत्र (नियतकालिक) निघाले मात्र त्याचा संपादक कोण ,
कार्यालय याची माहिती मिळत नाही असा उल्लेख लेले यांनी त्यांच्या ग्रंथात केला आहे
पुढे सन १८३२ साली मुंबई येथून आपल्या देशातील बांधवाना नव्या पाश्चात्य विद्येचा
परिचय करून देण्याचा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन बाळशास्त्री जांभेकरांनी “दर्पण” हे मराठी भाषेतील
वर्तमान पत्र सुरु केले आणि पहिले मराठी वर्तमान पत्र होण्याचा मान मिळवला आणि
येथूनच मराठी वर्तमान पत्राला आणि पत्रकारितेला सुरुवात झाली .
मराठी पत्रकारितेने समाजाला सुबुद्ध करण्याचे काम मोठ्या निष्ठेने केले आणि
प्राणपणाने परकीय सरकार विरुद्ध लढले अन अज्ञानाच्या अंधकारात बुडलेल्या आपल्या
समाजाला उजळ मार्ग दाखविला वृत्तपत्र हे नेहमीच सामान्य माणसाचे विद्यापीठ कार्य
करत असते सामान्य माणूस जसा बदलत जातो तसे वर्तमान पत्र बदलत जाते .
स्वातंत्र पूर्व काळात पत्रकारिता एक मिशन होती धर्म स्वातंत्र प्राप्ती हे
सर्व समावेशक ध्येय होते आणि समाजातील सर्वच घटक या ध्येयाप्रत आणण्यासाठी त्या
काळची पत्रकारिता कटिबद्ध होती .
दलित प्रेस
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांना समोर ठेवत मुंबई प्रांतातील सनातनी
पत्रांना वैचारिक शह देण्यासाठी बहुजन समाजातील जाणकारांनी आपली पत्र सुरु केली
,अहमदनगर जिल्ह्यातून मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र हे पत्र सन १८८२ ते १८९०
पर्यंत चालविले त्यानंतर इतरांनी ते पत्र पुढे १९४० पर्यंत चालविले ,संदेश हे
अच्युत कोल्ह्टकरांचे पत्र १९१४ पासून मुंबईत सुरु होते दैनिक स्वरुपात प्रसिद्ध
होणारया या पत्रात बातम्यासाठी मोठी जागा संपादकांनी दिले होती हे पत्र १९३१
पर्यंत सुरु होते .
महाराष्ट्रात अस्पृश्याची समस्या १८ व्या शतकात अधिकच तीव्र होत होती त्यामुळ
सदर समस्या दूर करण्याकरिता १८ व्या शतकोत्तर काळातील समाजसुधारक यामध्ये छत्रपती
शाहू महाराज लोकहितवादी ,महात्मा जोतीबा फुले ,गोपाल बाबा वाळगकर , विठ्ठल रामजी
शिंदे ,कृष्णराव भालेकर यांचे दीनबंधू आंबेडकर पूर्व दलित पत्रकारितेतील शिवराव
कांबळे ,किसन बनसोडे , गोपाल बाबा वाळगकर हे पहिले दलित पत्रकार त्यांचे लेखन
दीनबंधू प्रकाशित करत असत दलितांचे पहिले संपादक शिवराव कांबळे होत त्यांनी
सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र मासिक १ जुलै १९०८ रोजी सुरु केले तसेच कांबळे
यांनी आदी हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो सोमवंशीय मित्र पूर्वी
मराठा दीनबंधू १९०१ ,अत्यंज विलाप १९०६ ,महारंचा सुधारक १९०७ या तीन पत्राचा
उल्लेख आढळतो ,राजा राममोहन राय यांनी समाज सुधारणेच कार्य करत असताना हिंदू चालीरीती बंद केल्या तसेच सतीची चाल बंद केली
तसेच ते अस्पृश्य निर्मूलनाचे कार्य करत होते त्यामुळ त्यांना ब्राम्हणेतर कार्य
करणारे म्हणून ओळखू लागले याच काळात लोकमान्य टिळक , आगरकर ,रानडे , चिपलूनकर , खाडिलकर
,गाडगीळ तसेच कुलाबा जिल्ह्यातील शिवराम परांजपे ,भाऊ महाजन उर्फ गोविंद कुटे
इत्यादीचे ब्राम्हन समाजाचा विकास आणि सनातनी विचराचा प्रसार आणि प्रचार व
बहुजनांच्या आणि अस्पृश्याच्या प्रश्नाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत
बडोद्याच्या संस्थानाच्या ठिकाणाहून भगवंत पोळेकर यांनी जागृती हे पत्र सुरु
केले सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रसार हे पत्रक करत होते त्या करिता पाळेकरांनी
तन मन धन एक करून सदरचे पत्रक ३२ वर्षे चालविले .ब्राम्हणेतर पक्ष आणि सत्यशोधक
चळवळ यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी श्रीपतराव शिंदे यांनी १९१९ साली विजयी
मराठा हे पत्र सुरु केले.
बडोद्याची शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळ डॉक्टर आंबेडकरांना इंग्लंड हून भारतात
परत यावे लागले होते इंग्लंड हून परत आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी
स्वीकारली मात्र तेथेही त्यांना अपमानास्पद वागणूक मिळू लागल्याने बडोद्याची नोकरी
सोडून ते मुंबईला आले अन त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम कोलेज मद्ये प्र्ध्याप्काची
नोकरी स्वीकारली नोकरी करून त्यांच्या कडे रिकामा वेळ होता अन राजकीय घडामोडीत
अस्पृश्यावर अन्याय होत आहे हे लक्षत आल्यामुळ त्यांनी सार्वजनिक कार्यात लक्ष
घालण्यास सुरुवात केली आणि राजकारणात पुढाकार घेतला ,२० ओगस्ट १९१७ रोजी मॉटेगयू
सुधारणांची घोषणा आली या सुधारणा अमलात आणण्यासाठी साउथ बुरो समितीन
हिंदुस्थानातील लोकांच्या साक्ष घेण्याचे काम सुरु केले समिती पुढ अस्पृश्यांची
बाजू स्वतंत्र पणे मांडणे डॉ आंबेडकरांना इष्ट वाटले विठ्ठल रामजी शिंदे ,सर
नारायण चंदावरकर अशा स्पृश्य नेत्या कडून ती मांडली गेली तर राजकीय बाबतीत
अस्पृश्याची शेंडी स्पृश्यांच्या हातीच राहील हा धोका ओळखून सरकारी नोकरीत असताना
अस्पृश्यांची वतीने साक्ष देण्यासाठी डॉ आंबेडकरनी स्वताची निवड करून घेतली ,
नागपूर येथे झालेल्या परिषदेत हजर राहून त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चळवळी
वर त्यांनी प्रकश टाकला .
डॉ आंबेडकरांना
वृत्तपत्राची गरज वाटू लागली ...
अस्पृश्याचे तरून नेते म्हणून वावरू लागल्यावर त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी
आणि त्यावेळची दलित चळवळ आणि दलित पत्रकारिता बहुजनांच्या आणि अस्पृश्याच्या
प्रश्नाला वाचा फोडू शकत नाही व हि पत्रकारिता त्यासाठी असमर्थ ठरत आहे तसेच मुंबई
प्रांतातील सनातनी पत्रांना वैचारिक शह देण्यासाठी आणि दलित चळवळ आणि दलित
पत्रकारिता बहुजनांच्या आणि अस्पृश्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर
आंबेडकरांनी स्वतंत्र वर्तमान पत्र काढण्याचा विचार केला .
अन वर नमूद केलेल्या गरजेतून ‘ मूकनायक ‘ या पाक्षिकाचा जन्म झाला याकरिता
कोल्हापूर संस्थानातील शाहू राजे यांच्या चळवळीतील दत्तोबा संतराम पवार यांनी १९१७
साली शाहू राजेना डॉक्टर आंबेडकरां विषयी माहिती दिली होती त्यानंतर शाहू राजे
मुंबईला आले असता डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेने त्यांच्या काही समाजसेवकांनी
शाहू महाराजांची भेट घेतली व दलित चळवळीसाठी वर्तमान पत्र काढण्याची कल्पना व
आवशकता त्याचे पुढे मांडली ती शाहू राजेना पसंत पडली व त्यांनी वर्तमान पत्र सुरु
करण्यासाठी अडीच हजारांचा चेक दिला अन डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरु
केले या पाक्षिकाचे संपादक डॉक्टर आंबेडकरांनी वर्हाडातील एक अंडर ग्राजुएट तरून
महार गृहस्त पांडुरंग नंदुराम भटकर याची नियुक्ती डॉक्टर आंबेडकरांनी केली पत्रावर
बाबासाहेबांच नाव नसल तरी मुक्नाय्क्ची प्रेरक शक्ती डॉक्टर आंबेडकर आहेत आणि
मूकनायक हे दलित चळवळीचे मुखपत्र आहे हे सर्वाना माहित होते या पत्राचा पहिला अंक
३१ जानेवारी १९२० रोजी बाहेर पडला पत्राच्या पहिल्या चौदा अंकातील अग्रलेख डॉक्टर
आंबेडकरांनीच लिहले होते , बाबासाहेबांना इंग्रजीतून लिहण्याची सवय असल्याने
मूकनायकचा मजकूर ते इंग्रजीत लिहायचे अन तो मराठीत भाषांतरीत स्वतः करीत असे
मूकनायक म्हणजे उक जणांना बोलायला लावणारे साधन हे सूचित करणारे होते ,इतर अनेक
बारीक सारीक पत्राची दखल घेणाऱ्या केसरीने मूकनायक ची दखल घेतली नाही अन पैसे घेऊन
जाहिरात छापण्यास हि केसरीने नकार दिला .
मूकनायक हे पत्र मनोरंजन या छापखान्यात सुरवातीस छापले जात असे तर पत्राची
कचेरी परळ ला हरळवाला बिल्डिंगमध्ये मध्ये होती या पत्रासाठी बाबासाहेबानी रामायण
, महाभारत , दासबोध इत्यादी ग्रंथ चाळून तुकाराम महाराजांच्या अभंगाचे खालील चरण
निवडले आणि ते फोल्या पानावर छापत असत.
काय करू आता धरुनिया मौन !
निशंक हे तोंड वाजविले !!
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जान !
सार्थक लाजून नव्हे हित !!
डॉ आंबेडकर मूकनायक च्या पहिल्या अंकाच्या मनोगतात लिहतात
“ आमच्या या बहिष्कृत लोकावर होत असलेल्या व पुढे
होणार्या अन्यायावर उपाय योजना सुचविण्यात तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग
याच्या खर्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमी नाही परंतु
मुंबई इलाक्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पहिले असता असे दिसून येईल कि त्यातील
बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत इतर जातीच्या हिताची पर्वा
त्यांना नसते इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप
निघतात अशा वृतपत्रकारांना आमचा एवढा इशारा आहे कि कोणतीही एखादी जात आक्रमक झाली
तर तिच्या आव्न्तीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही .
एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष्य नुकसान करणाऱ्या
जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही म्हणून स्वहित साधू पत्रकानी इतरांचे
नुकसान करून आपले हित करायचे पद्धत मूर्खाचे लक्षण शिकू नये हा बुद्धिवाद ज्यांना
कबूल अशी वर्तमान पत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणावे लागेल दिनमित्र , जागरूक ,
डेक्कन रयत , विजयी मराठा , ज्ञानप्रकाश , इंदुप्रकाश , सुबोध पत्रिका वैगरे
पत्रातून बहिष्कृत पत्राची चर्चा वरवर होते परंतु ब्राम्हणेतर अवडंबर संज्ञेखाली
मोडत असलेने अनेक जातीच्या प्रश्नाचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृत प्रश्नाचा
सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही हेही पण उघडच आहे त्यांच्या
अति बिकट स्थितीशी संबंध असलेल्या प्रश्नाची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र
पाहिजे हे कोणीही कबूल करील हि उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे .
खास अस्पृश्यांचा हित हिताची चर्चा करण्यासाठी सोमवंशीय मित्र ,हिंद नागरिक ,
विराल विध्वंसक हि पत्रे उपजली व लोपहि पावली परंतु त्रीविदा कडून योग्य
prrprpप्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वज्नोधाराचे महत्वाचे कार्य
करनार्यास योग्य पथ दाखवील असे आश्वासन देताना ते अनुभवांनी खोटे ठरणार नाही अशी
ग्वाही बाळगून हे स्वयश निवेदन आटोपते घेतो “
( च म खैरमोडे डॉ आंबेडकर खंड पहिला मुंबई १९५३ पृष्ठ २६० – ६२ )
मुकनायकच्या पहिल्या अंकात अस्पृश्य समाजाच्या राजकीय आकांशा या संबधी
लिहलेल्या स्फुटात बासाहेबानी म्हंटले होते कि “ राजकीय सत्ता मिळउन तिच्या
जोरावर सामाजिक विश्म्ते दडपण कायम करू पाहणाऱ्याचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला
आहे “
लोकमान्य टिळकांचा पुण्यात जो सत्कार होणार होता त्याबद्दल लिहिताना टिळकांनी
मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाला अद्ज्ञानात व अवनतीत ठेवण्यास आपले पुण्य खर्ची
घातले या शिवाय त्यांची वतारना करण्यासाठी टिळकांनी कमी केले नाही असे स्पष्ठपणे
सांगून १९१८ साली मुंबईत झालेल्या अस्पृश्यता निवारण सभेची हकीकत एका अक्षरानेही
केसरीत प्रसिद्ध झाली नाही व अस्पृशोधोराच्या जाहीर नाम्यावर शी देण्याशी टिळकांनी
टाळाटाळ केली त्या बद्दल स्फुटात बाबासाहेबांनी परखड टीका केली होती शेवटी
टिळकांच्या स्त्कारालाही विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले होते . घोलपांनी मूकनायक सातार्यात नेऊन चालविले या
बाबत बाबासाहेबांनी केलेला खुलासा “ डॉ आंबेडकर यांचा खुलासा मुकनायकचे पुनुरूजिवन “ “ खरे म्हंटले असता घोलप यास माझ्या परवानगी शिवाय मूकनायक पत्र काढण्याचा
कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही , मला वाटल्यास मी ते बंद करू शकेन परंतु मला पोट
भरण्यास दुसरे साधन नाही तर मी पत्र काढू नको तर काय करू ? असे त्यांनी माझ्या एका
मित्राशी काढलेले उद्दगार माझ्या कानी आल्यामुळ मी हरकत घेतली नाही ......शाहू
महाराजाकडून पुरवठा होत असताना जर पत्र स्वयं पोषक झाले नाही तर हल्लीच्या
aspaspraspruasprusasprushasprushyअस्पृश्य वर्गाच्या विश्व अवस्थेत ते स्वयं पोषक
होईल किवा त्यात किफायत पडेल हा प्रश्न .....विचार करण्यासारखा आहे .
(डॉ आंबेडकर ज्ञानप्रकाश ८ डिसे १९२३ व
अस्पृश्यांचा कैवारी ८ डिसे १९२३ )
कुलाबा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्हा येथून प्रसिद्ध होणारे रामभाऊ यांच्या “ कुलाबा समाचार “ हे वर्तमान पत्र या पत्राचे सामजिक व आर्थिक
धोरण व्यापक व पुरोगामी राहिले नाही , शेतकर्यांचे ,कुळाचे प्रश्न ,कुळकायदा
इत्यादी बाबत कुलाबा समाचार ने जमीनदाराची बाजू घेतली ,डॉ आंबेडकरांनी महाडच्या
चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हाही कुलाबा समाचार चे धोरण त्याला अनुकूल
नव्हते निर्भेळ पाठीराख्याची भूमिका
पत्राने घेतली नाही .
डॉ आंबेडकर यांची सारखा तरून तडफदार आणि विद्वान
नेत्याच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजात जागृती होऊ लागून समाजाच्या उन्नतीसाठी
अस्पृश्य कडूनच विशेष संघटीत प्रयत्न होण्यास प्रांरम्भ झाला होता
आपल्या समाजाला जागृत करून स्वावलंबनाणे कृती
सन्मुख करण्यासाठी त्यांना १९२४ साली बहिष्कृत हित्कारणी सभेची साठ्प्ना केली सभेत
पददलितांच्या सर्व पोट जातींचा सुधारक पंथी आणि सुवर्णाचा समावेश होता , चांभार
समाजातील शिवतरकर हे या संस्थेचे सर चिटणीस होते शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा
! हे संस्थेचे ब्रीद वाक्य होते .
१९२० साली मूकनायक चालविताना आलेले कटू अनुभव
पाठीशी असताना त्यांनी पुन्हा वृत्तपत्र काढण्याचा संकल्प केला व त्य दृष्टीने
पावले उचलली आणि स्वताच्या नावाने एक हस्त पुस्तिका तयार करून ती ४ डिसेम्बर १९२४
रोजी प्रस्तुत केली ,या पत्रिकेत वर्तमान पत्र काढण्यासाठी संस्था स्थापन करावी
आणि त्यासाठी २० हजारांचा निधी उभा करण्याचा संकल्प केला होता या निधीची कामगिरी
पुण्याचे रामचंद्र कृष्णाजी कदम यांचे कडे सोपविण्यात आली होती .
१९ व २० मार्च रोजी कुलाबा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्हयातील म्हाड
गावी बहिष्कृत हितकारिणी सभेचे अधिवेशन झाले अन या अधिवेशनात डॉ आंबेडकरांनी चवदार
तळ्याचे पाणी सामुहिक रित्या प्राशन केले अन यावेळी हाती आलेल्या निधीच्या बळावर
रविवार दिनांक ३ एप्रिल १९२७ रोजी त्यांनी “बहिष्कृत भारत “ या पाक्षिकास प्रारंभ केला
पक्शिकाचा पहिला अंक मोरेश्वर चिंतामण लेले यांच्या विक्रम प्रिंटींग प्रेस मध्ये
छापण्यात आले होते आणि या पाक्षिकाचे संपादक म्हणून खुद्द डॉ आंबेडकरांचे नाव
जाहीर करण्यात आले होते ,नोव्हेंबर १९२७ पासून “बहिष्कृत भारत” करिता विकत
घेतलेल्या भारत भूषण प्रिंटींग प्रेस मधून हे पाक्षिक छापण्यात येऊ लागले .
“बहिष्कृत भारत” च्या पहिल्या अंकाच्या मनोगतात ते लिहतात “ हिंदू धर्मात असलेली हि विषमता जितकी अमानुष आहे तितकीच ती निंदास्पद आहे
कारण विशमतेनुसार होणार्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शिलाला शोभण्यासारखे
खास नाही ,हिंदू धर्मात समाविष्ट होणार्या जाती उच्च नीच भावनेन प्रेरित झाल्या
आहेत हे उघड आहे हिंदू समाज हा एक मनोरा आहे व त्यामधील एक एक जात म्हणजे त्याचा
मजला आहे पण लक्षत ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे कि मनोर्याला शिडी नाही आणि म्हणून
एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही ज्या मजल्यात ज्यांनी
जन्मावे त्याच मजल्यावर त्यांनी मरावे खालच्या मजल्यातील इसम मग तो कितीही लायक
असो त्यास वरच्या मजल्यावर जाता येत नाही आणि वरच्या मजल्यातला इसम कितीही नालायक
असला तर त्यास स्वताचा मजला सोडून देण्याची कोणाची आज्ञा नाही . (बहिष्कृत भारत पृष्ठ क्र ३४५ )
या अंकात अंडाकृती भारताच्या नकाशात अंकाचे नाव ठळक अक्षरात छापलेले होते
दुसर्या अंकापासून हे चित्र वगळण्यात आले पहिले १३ अंक वेळेवर डॉ आंबेडकरांनी
काढले . या अंकाची वार्षिक वर्गणी ३ रुपये होती आणि किरकोळ किमत दीड आना होती पुढे
कामाच्या व्यापामुळे डॉ आंबेडकरांनी १४ ते १६ अंक ७ नोव्हेंबर १९२७ रोजी काढले आणि
१७ ते १८ हे २५ नोव्हेंबर १९२७ तसेच २२ ते २४ अंक १ फेबुरवारी १९२८ रोजी निघाले .
वर्गणी दाराच्या बेफिकिरीमुळ “बहिष्कृत भारत” अनियमित होत आहे अस लक्षात आल्यावर संपादक डॉ आंबेडकर यांनी वर उल्लेख केलेल्या अग्रलेखात
व्रवर्गणीदारांचा खरपूस समाचार घेतला “आमच्या खट्याळ व नाटाळ वर्गणीदारानी आणि इतर
आश्रय दात्यांनी लक्षात ठेवावयास पाहिजे कि मी बहिष्कृत भारताची संपादकी हा इतर
पत्राच्या स्म्पाडकी प्रमाणे पैसे कमविण्याचा धंधा नसून हि लोकजागृती करिता
घेतलेली स्वयंशिक्षा होय अशा लोकसेवेत दीक्षित झालेल्या इसमाने काढलेल्या पत्रास काटेकोरपणे
वागविणे अनुदार पणाचे आहे “ बहिष्कृत भारत च्या पहिल्या अंकात म्हणजे ३
एप्रिल १९२७ च्या अंकात संपादक डॉ आंबेडकर यांनी आपले मनोगत “ पुनश्च हरी ओम ! “ या मथळ्याचा अग्रलेख लिहून
व्यक्त केले
१९१९ चा सुधारणा कायदा अमलात येऊन हिंदू लोकांचा
सत्तेत प्रवेश झाला होता पण अस्पृश्याची स्थिती बदलली नाही म्हणून बहिष्कृत
वर्गातील लोकांनी लगेच हालचाल केली नाही तर काय अवस्था होईल याचा विचार करता आत्तच
चळवळ सुरु केली पाहिजे व त्याचाच एक भाग म्हणून बहिष्कृत भारत सुरु केले असल्याचे
संपादक डॉ आंबेडकर यांनी स्पष्ट
केले .
सन १९९५ साली दादर येथे डॉ आंबेडकर यांच्या वृत्तपत्रात काम केलेले
भद्रेकर व त्याच्या मित्र मंडळींनी समाज समता संघाची स्थापना केली आणि या संघाचे
अध्यक्ष डॉ आंबेडकर यांना होण्याची विनंती केली व डॉ आंबेडकर
हे त्यांच्या विनंती वरून संघाचे अध्यक्षी झाले
आणि याचा संघाच्या वतीने १९२८ सली समता हे पत्र
डॉ आंबेडकर यांनी सुरु केले
आणि पत्राच्या संपादकाची जबाबदारी देबराव विष्णू नाईक यांचेवर सोपविण्यात आली तर
भद्रेकर यांचेवर पत्राची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती . सन १९२७ ते १९३४ या
काळात डॉ आंबेडकर यांनी अस्पृश्याचे हक्क लढा अधिक तीव्र केला यात महाडचा चवदार
तळ्याचा सत्याग्रह , नाशिकचा कला राम मंदिर प्रवेश , गोलमेज परिषद ,गांधीजीचे
उपोषण , पुणे करार या सर्व कामगिरी मध्ये समताने व पुढे नामांतर झालेले जनताने
मोलाची कामगिरी बजावली डॉ आंबेडकरांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या बडोद्याच्या
सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकराना देऊ केलेल्या आर्थिक मदतीतून डॉ आंबेडकर यांनी
जनता साठी मोठी छपाई मशीन खरेदी केली .
या जनता मधून डॉ आंबेडकर स्वतः लिहित असे त्यांनी १९३५ व १९३६ साली धार्मिक
,सामाजिक ,भूमिका स्पष्ट करताना हे प्रश्न धसाला लावण्यासाठी ते लेखन करत असत
१९३७ साली डॉ आंबेडकरानी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर
पक्ष तर्फे निवडणूक लढविली त्यावेळी जनता पत्राने विशेष कामगिरी बजावली , १९३१
साली निघालेले जनता हे पत्र फेबुर्वारी १९५६ चालू होते पुढे विजया दशमीच्या
मुहूर्तावर डॉ आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौध धर्माचा स्वीकार
केला याचाच एक भाग म्हणून जनता पत्राचे नामांतर करून ४ फेबुर्वारी १९५६ पासून “प्रबुद्ध भारत” हे साप्ताहिक डॉ
आंबेडकर यांनी सुरु केले .
भारत स्वतंत्र होण्या आधी हिंदुस्थान सरकारने वृत्तपत्र विषयक धोरणाचा फेर
विचार सुरु केला आणि वृत्तपत्र विषयक कायद्याची तपासणी करण्यासाठी एक समिती १९४७
साली नेमण्यात आली त्या समितीने १९४८ साली आपला अहवाल सादर केला सध्याचा वृत्तपत्र
विषयक कायदा रद्द करून त्याचा सर्वसाधारण कायद्यात समावेश करावा अशी समितीची
शिफारस होती ,दरम्यानच्या काळात सरकारने
समितीची शिफारशी वर कसलीच हालचाल केली नाही सदर शिफारशी मुळ घटनेत दुरुस्ती
करावी लागणार होती आणि त्यावेळचे कायदा मंत्री डॉ आंबेडकर यांनी घटनेत दुरुस्ती
करून वृतपत्र विषयक कायदा लागू केला .
माहिती संकलन , संपादन आणि लेखन
श्री आनंद मारुती लोखंडे
एम एस सी एम एड सी सी जे
व एम ए जनसंज्ञापन
सोलापूर विद्यापीठ सोलापूर २०१६ – २०१८
No comments:
Post a Comment